*बाधित व सदोष हवामान नोंदीमुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान !*

*बाधित व सदोष हवामान नोंदीमुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान !*

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट मध्ये आंबा नुकसान भरपाई दरवर्षीपेक्षा खूपच कमी ? काजूची तर गेले तीन वर्ष नाहीच*

*बाधित व सदोष हवामान नोंदीमुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान !*

*१००% नुकसानीला अत्यल्प नुकसान भरपाई*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी तांत्रिक त्रुटीमुळे सन २०२५/२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित आंबा- काजू फळपीक विमा योजना अंतर्गत,भरपाई पासून वंचित आहेत. तर काही भागात अत्यल्प भरपाई खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे १०० टक्के नुकसान होऊन सुद्धा, अत्यल्प भरपाई मिळाल्याने तर काही भागात भरपाईच मिळाली नसल्याने प्रशासनाच्या कामावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. या शेतकऱ्यांबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी माझी जि. प.सदस्य सतीश सावंत यांच्या मागणीवरून पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवार ता.१० ऑगस्ट रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शेतकरी/ बागायतदारांच्या गंभीर प्रश्नांची उकल होऊन भरपाई देण्यात यावी अथवा अत्यल्प बागायतदारांची उर्वरित फरकाची रक्कम त्वरित जमा करावी. आणि काजू पिकांची गेल्या तीन वर्षाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी आग्रही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!