फोंडाघाट गांगोमाऊली गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ जल्लोषात

फोंडाघाट गांगोमाऊली गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ जल्लोषात

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट गांगोमाऊली गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ जल्लोषात*

*चित्तथरारक थर रचण्यात गांगोमाऊली गोविंदा पथकाचे धाडस कौतुकास्पद.– मनोज रावराणे/ संजय आग्रे*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

पावसाळ्यातील निसर्गरम्य धबधबे, हिरवाई आणि वर्षा पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर वेध लागतात ते श्रावण महिन्यातील संस्कारक्षम, पवित्र सणांचे ! त्यातही गोकुळाष्टमीचा युवांचा उत्साह अवर्णनीय !पारंपारिक खेळ, धाडस आणि जिद्द यांचा अपूर्व संगम ! पुणे मुंबईच्या धर्तीवर कोकणातही दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लावून गावोगावी गोविंदा पथके आकार घेत आहेत …

फोंडाघाटच्या गांगोमाऊली गोविंदा पथकाच्या सरावाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात सुनील व सुधाकर सावंतबंधू यांच्या पटांगणात नुकताच संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, जि. प. सदस्य मनोज रावराणे, प.स.सदस्य पवन भालेकर, संदेश पटेल ,भामा सावंत, छोटू सावंत, विलास लाड, बंडुनाना, संजय सावंत, बाळा भिरवंडेकर, हेमंत कोंडेकर, रामभाऊ घाडगे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अल्पावधीत या पथकाने शिस्त, संयम, परिश्रम, संस्कार यांच्या जोरावर जिल्ह्यामध्ये नाव कमविले आहे. त्यांच्या या धाडसी खेळासाठी आम्ही विमा, सुरक्षाकवच, प्रवास इत्यादीसाठी सदैव सहकार्य करू. मुंबई पुणे शहरात सुद्धा गांगोमाऊली गोविंदा पथकाचा डंका सदैव वाजावा.याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा सर्वश्री संजय आग्रे व मनोज रावराणे यांनी दिल्या.

शुभारंभ मान्यवरांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच गोविंदाची जर्सी आणि बॅनर चे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.पथकाने चित्तथरारक सहा थरांचे प्रात्यक्षिक दाखवून, सर्वांची वाहवा मिळवली. उंच थरावरील गोविंदा यज्ञेश गुरवचा आग्रे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. सूत्रसंचालन जोईल सर तर अनिल शेळके अध्यक्ष यांनी आभार मानले पथकाला मार्गदर्शन करणारे विशू घाडगे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अनिकेत सावंत, मुकेश सावंत, दीपक जोईल, प्रतीक जोईल, सुनील जोईल, समीर लाड, नितेश गुरव, रुपेश चव्हाण, रामभाऊ घाडगे, शुभम सावंत, संदीप जोईल, ऋतिक जोईल, स्वप्निल घाडगे, निमिष सावंत, मनोज सावंत, प्रदीप सावंत, विजय लाड, कीर्तीराज जोईल, रुपेश कदम, नामदेव करुळकर, अवधूत जोईल, हर्षद (सोनू) सावंत, निवृत्ती जोईल, आबा जोईल, बाळा खांबाळेकर, संतोष सावंत इत्यादी गोविंदा आवर्जून उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!