वेंगुर्ले आगारातून बाळूमामा दर्शन साठी अकरा रोजी बस निघणार

वेंगुर्ले आगारातून बाळूमामा दर्शन साठी अकरा रोजी बस निघणार

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले आगारातून बाळूमामा दर्शन साठी अकरा रोजी बस निघणार*

*महिला, 65 वर्षावरील व्यक्ती व 75 वर्षावरील नागरिक यांची संख्या 40 झाल्यास बस वेटींग ठेवून परतीचा प्रवास मिळेल*

*वेंगुर्ले तालुक्यातील बाळूमामा भक्तांना सुवर्णसंधी*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राप वेंगुर्ला आगारा मार्फत अमावस्या वारी निमित्त मंगळवार दि. 11 आँगष्ट रोजी दुपारी 12 वाजता वेंगुर्ला ते आदमापूर बाळूमामा दर्शनासाठी एस.टी. बस सोडण्यात येणार आहे.
सदर बस वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी, धवडकी, माडखोल, आंबोली, आजरा पिंपळगाव, गारगोटी मार्गे आदमापूर अशी जाणार आहे. 40 प्रवाशांचा गट किंवा विविध गावातून बाळूमामा चे भक्तगण जाण्यासाठी तात्काळ वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून 40 जणांची नोंदणी झाल्यास थेट बाळूमामा दर्शन अशी बस सोडण्यात येणार आहे. हि बस वस्तीला राहून तेथूनच पुन्हा बाळूमामा भक्तांना वेंगुर्ले येथे घेऊन येईल. या बसने केवळ जाण्याचा प्रवास खर्च रु. 300/- एवढा आहे. महिला व 65 वर्षावरील व्यक्तींना अर्धे तिकीट म्हणजे रु 150/- तर 75 वर्षे पुर्ण झालेल्यांना मोफत प्रवास मिळणार आहे. त्यामुळे केवळ बाळूमामा दर्शन अशी प्रवासी यात्रा होण्यासाठी बस मधील 40 सीटचे बुकींग (75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसह) झाल्यास वेंगुर्ले ते बाळूमामा दर्शन अशी प्रवासी बस सोडली जाईल. व बाळूमामाचे दर्शन सोहळ्यानंतर तिथून पुन्हा सर्व प्रवाश्यांना बस ने माघारी येता येणार आहे.
बाळूमामा दर्शनासाठी भाविक वा भक्तगणांतून आपापल्या गावातून जाणाऱ्या 40 भक्तगणांना एकत्र करुन त्याची नोंदणी म्हणजे बुकींग वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांच्याकडे केल्यास त्याप्रमाणे बाळूमामा दर्शन यात्रा बस 40 प्रवासी बुकींग करणाऱ्या गावातून सोडण्यात येणार आहेत.
बाळूमामा दर्शनास जाणाऱ्या भाविकांनी वेंगुर्ले आगारातर्फे खास बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना, 65 वर्षे वयावरील नागरिकांना हाफ तिकीट तर 75 वर्षे पुर्ण झालेल्या नागरिकांना मोफत प्रवास या संधीचा लाभ मिळणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9371911073 येथे संपर्क करण्यात यावा. तसेच इतर माहिती करिता आगारास भेट देण्यात असेही सुचीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!