*व्यापारी महासंघाचा ३१ जानेवारीला व्यापारी एकता मेळावा कणकवलीत*

*व्यापारी महासंघाचा ३१ जानेवारीला व्यापारी एकता मेळावा कणकवलीत*

*कोकण  Express*

*व्यापारी महासंघाचा ३१ जानेवारीला व्यापारी एकता मेळावा कणकवलीत…*

*जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांची माहिती; ऑनलाईन पध्दतीने होणार मेळावा..*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ ३४ वा व्यापारी एकता मेळावा कणकवलीत ३१ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.कोरोना काळातील महामारीमुळे नियमानुसार दुसऱ्या वेळी ऑनलाइन पध्दतीने हा मेळावा घेण्यात येणार आहे.या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री उदय सामंत,खा.विनायक राऊत, माजी मंत्री सुरेश प्रभू, आ.नितेश राणे,चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी,सभापती मनोज रावराणे,नगराध्यक्ष समीर नलावडे,सुनील सौदागर,मुख्य व्यवस्थापक एसबीआय लक्ष्मण सरबळकर,गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई,विनय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी दिली.

कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यवाह नितीन वाळके, सहकार्यवाह राजू जठार, संजय भोगटे, सागर शिरसाठ, अरविंद नेवाळकर, तालुका उपाध्यक्ष राजन पारकर राजू गव्हाणकर निवृत्ती धडाम, चंद्रशेखर गणपत्ये,दीपक भोगले,संतोष कुडाळकर ,श्रीराम शिरसाठ यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व कणकवली तालुक्यातील व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्ताने ३१ जानेवारीला सर्व दुकाने,आस्थापना बंद राहणार आहेत.राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग संघटना आहे.ती दरवर्षी व्यापाऱ्यांच्या हितासाठी आणि एकतेसाठी मेळावा घेत आहे .निमंत्रण पत्रकेत क्यूआर कोड देऊन हा मेळावा ऑनलाईन पाहता येणार आहे,असे श्री.पारकर यांनी सांगितले.

कार्यवाह नितीन वाळके म्हणाले,
३४ वर्षे स्थापना दिन साजरा करणारी राज्यात दुसरी संघटना नाही.जिल्ह्यातही दुसरी संघटना नाही.बाजारपेठामध्ये व्यापारी संघटना अनेक आहेत,त्याचा जिल्ह्यात एक संघ आहे.गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे व्यापारी भरडला गेला आहे.व्यापाऱ्यांनी अत्याआवश्यक सेवा देण्याचे काम केले.व्यापाऱ्यांनी कौतुक नशिबी आले नाही.व्यापारी मेळावा झालाच पाहिजे,हे सर्वांचे मत होते.त्यामुळेच कोरोना नियम लक्षात घेऊन आम्ही हा मेळावा करत आहोत.महासंघ हा व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.फायदा व्यापाऱ्यांना होत असल्यानेच एकता मेळावा घेतला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ बाजारपेठा आहेत.महासंघाचे काम लोकांपर्यंत पोहचवत आहोत.व्यापाऱ्यांना उद्योगाचा दर्जा दिला आहे,त्याचा फायदा घेतला पाहिजे. व्यापारी महासंघाचे छताखाली विविध व्यापारी संघटना या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर म्हणाले,व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारीला चौंडेश्वरी सभागृहात होणार आहे.हा मेळावा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. व्यापारी आर्थिक संकटात आहेत.व्यापारी यांच्याकडून अनुदान न घेता बँकेमार्फत जमा केले जाणार आहे, मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!