रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी• अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे• कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब• फळपिकांच्या संरक्षणासाठी फ्रूट कव्हर वापरण्यास अनुदान• उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम• भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी .. मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी• १४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन• अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर• दिल्लीत राष्ट्रीय नेमबाजीत फोंडाघाटच्या मनस्या फालेची सुवर्ण कामगिरी• अद्वैत नेवगी हे रिव्हर्स मायग्रेशनचं अतिशय उत्तम उदाहरण -पालकमंत्री नितेश राणे• कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या• *हळवल गणपती साना येथे मा.आ. वैभव नाईक,सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ• “स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब

कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या

📅 २२ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या

*कोंकण एक्सप्रेस

*कोकणातील जल, जंगल, जमिनी वाचविण्यासाठी कायदेशीर मार्गांनी लढा द्या

*ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांचे आवाहन : हुतात्म्या दिनानिमित्त गोपुरीत विशेष अभिवादन सभा

*कणकवली : प्रतिनिधि

जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संपत्तीमुळे कोकण समृद्ध आहे. कोकणात सरकार पंप स्टोरेज प्रकल्प, अणू ऊर्जा, रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प आणत आहेत. या प्रकल्पांमुळे जल, जंगल, जमिनी ओरबडल्या जाणार आहेत. या प्रकल्पांविरोधात कोकणी माणसांनी रस्त्यावरची लढाई लढताना कायदेशीर मार्गांनी लढा दिला पाहिजे. निसर्गाचा ºहास होणाºया प्रकल्पांविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये प्रकल्पविरोधाचा ठराव घ्यावा, जेणेकरून पर्यावरण व निसर्गाचा ºहास होणारे प्रकल्प उभारणे सरकारला करणे अशक्य होईल. महात्मा गांधी हा विचार आहे, हा विचार कोणाही मारू शकत नाही, जनतेने आपल्यावर होणाºया अन्यायाविरोधात गांधी मार्गाने लढा द्यावा, असे आवाहन लेखक तथा ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांनी केले. महाराष्टÑत सध्या अतिरेकी विकास सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत प्राणांची आहुती दिलेल्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गोपुरी आश्रम यांच्यावतीने आश्रमाच्या चिकूच्या बागेतील पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ विचारपीठ येथे विशेष अभिवादन सभा आयोजित केली होती. या प्रसंगी श्री. गावंडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश लब्दे, गोपुरी आश्रमाचे अध्यश्र प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सेवानिवृत्त माहिती अधिकारी सतीश लळीत, उद्योजक सुरेश नेरूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. गावंडे म्हणाले, महाराष्टÑात महात्मा गांधी यांच्या विचारांवर काम करणाºया अनेक संस्था कार्य करीत आहेत. त्याप्रमाणे बिहार, तामिळनाडू यासारख्या अन्य राज्यांत अशाप्रकारचा संस्था कार्यरत आहेत. अन्यायविरोधात लढा देण्याची ताकद गांधी विचारांमध्ये आहे. गांधींचा विचार कोकणवासीयांनी आत्मसात केला पाहिजे. सरकारने निवडणुका जिंकण्याचे तंत्र अवगत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्न व समस्यांबाबत त्यांना काही देणे घेणे राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्टÑात विनाशकारी प्रकल्प जल, जंगल, जमिनी असलेल्या भागांमध्ये लादले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये राजकीय पक्षांचे आर्थिक हित असते. त्यामुळे अशाप्रकाराला राजकीय पक्ष विरोध करीत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. तसेच महाराष्टÑाचे मराठी व राष्टÑपण टिकवून ठेवणे ही खरी हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

जयप्रकाश लब्दे म्हणाले, मुंबईसह महाराष्टÑ आपल्या सहपणे मिळालेला नाही. त्यासाठी १०७ जणांनी प्राणाची आहुती दिली. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा मुंबई महाराष्टÑापासून तोडण्याचा डाव होता, तो डाव संयुक्त महाराष्टÑ लढयाने उधळून लावला होता. २०१४ नंतर पुन्हा एकदा मुंबई महाराष्टÑापासून तोडण्याचे राज्यकर्त्यांचे मनसुबे आहेत. त्यांचे हे मनसुबे मराठी मासणांनी एकत्र येऊन उधळून लावले पाहिजे, ही हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. संयुक्त महाराष्टÑ लढयातील हुतात्म्यांना महाराष्टÑ घडविण्याचे पाहिलेले स्वप्न तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करूया, असे आवाहन त्यांनी केले.

राजेंद्र मुंबरकर यांनी संयुक्त महाराष्टÑ लढयाचा इतिहास सांगून गोपुरीच्या कार्याची माहिती दिली. सरकारविरोधात भूमिका घेणाºया अर्बन नक्षलवादी ठरवले जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. प्रकल्पांच्या नावाखाली कोकणातील जल, जंगल, जमिनी ओरबडल्या जाणार असतील तर कोकणी माणसाने याविरोधात कायदेशीर आयुधांचा वापर करून लढा दिला पाहिजे, अशी अपेक्षा लळीत व्यक्त केली. आरंभी मान्यवरांचे स्वागत गोपुरी आश्रमाच्यावतीने पुस्तक देऊन करण्यात आले. त्यानंतर असरोंडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्टÑगीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. शेवटी जयप्रकाश लब्दे यांनी संयुक्त महाराष्टÑ एकसंघ राहण्यासाठीची उपस्थितांना शपथ दिली. या सभेला गोपुरीचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, खजिनदार विनायक सापळे, सदस्य संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, महानंदा चव्हाण, कमालकर निग्रे, नितीन तळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →