रविवार, २७ सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य• पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे• भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन• पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट; ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना• दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!• सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये• शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक• पश्चिम घाट 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्रात खाणकाम, मोठ्या प्रकल्पांवर पूर्ण बंदी; मात्र घरदुरुस्तीला मुभा• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य• पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे• भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन• पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट; ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना• दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!• सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये• शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक• पश्चिम घाट 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्रात खाणकाम, मोठ्या प्रकल्पांवर पूर्ण बंदी; मात्र घरदुरुस्तीला मुभा• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे

📅 २७ सप्टेंबर, २०२६👁 १०ब्रेकिंग
पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे*

*नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय आत्मसात करावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील नवलादेवी वाडी येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसातील खंडामुळे शेतीवर झालेल्या परिणामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी लक्ष्मण विठोबा हिवाळकर यांच्या शेतातील भातशेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी यावेळी पावसाअभावी भातपिकाच्या वाढीवर झालेल्या परिणामांची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे भात पिकाला अपेक्षित फुटवे आलेले नाहीत. तसेच भाताचे दाणेही पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याचे शेतकरी लक्ष्मण हिवाळकर यांनी सांगितले. पावसातील खंडाचा परिणाम तालुक्यातील ऊस पिकावरही झाला असून ऊस शेतीचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणात भाताच्या विविध जातींसह उसाच्या शेतीची अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. जुने जाणकार शेतकरीही याची जाणीव करून देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद आणि अनुभवाच्या आधारे मिळालेली माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविली जाईल. केवळ उपलब्ध आकडेवारी किंवा गुगल मॅपच्या आधारे नव्हे, तर प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची स्पष्ट भूमिका घेतली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याची वस्तुस्थिती शासनासमोर भक्कमपणे मांडून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सध्याची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची आणि पाण्याचे नियोजन करण्याची सवय आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. गावपातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाणी अडविणे आणि त्याचा काटकसरीने वापर यासाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पावसातील खंडामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री राणे यांनी दिली. ट्रिगर-१ अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या सवलती आणि उपाययोजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, उपसभापती साची कोलते, माजी सभापती भालचंद्र साठे, नासीर काझी, जि. प. सदस्य श्रावणी रावराणे, जि. प. सदस्य रिद्धी सुतार, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, प. सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, मंगेश लोके, महेश संसारे, सरपंच लीना पांचाळ, श्रद्धा रावराणे, बंड्या मांजरेकर, साधना नकाशे, रितेश सुतार, बाबा कोकाटे, परशुराम इस्वलकर.

तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बासुर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, कृषी अधिकारी कांता जाधव, विस्तार अधिकारी प्रवीण कुडतरकर, व अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →