रविवार, २७ सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य• पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे• भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन• पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट; ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना• दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!• सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये• शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक• पश्चिम घाट 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्रात खाणकाम, मोठ्या प्रकल्पांवर पूर्ण बंदी; मात्र घरदुरुस्तीला मुभा• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर• सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य• पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे• भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन• पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट; ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना• दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा!महायुती सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास द्या.!• सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये• शेअर्स खरेदी प्रकरणी फसवणूक करून 2024 पासून नजरेआड असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक• पश्चिम घाट 'इको सेन्सिटिव्ह' क्षेत्रात खाणकाम, मोठ्या प्रकल्पांवर पूर्ण बंदी; मात्र घरदुरुस्तीला मुभा• जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराना मारहाण व तोडफोड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता• कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर

भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन

📅 २७ सप्टेंबर, २०२६👁 ६ब्रेकिंग
भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपच्या संघटनबांधणीला वेग; 263-दापोली-मंडणगड-खेड चिंतन बैठकीत प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना थेट ॲक्शन प्लॅन*

*आमदार प्रमोद जठारांचा कार्यकर्त्यांना ‘गाव तिथे बैठक’ चा मंत्र!*

*दापोली : प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टीच्या 263-दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, पक्षाचा जनसंपर्क आणि विविध सेवा उपक्रमांबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’, ‘गाव तिथे बैठक’ आणि ‘मन की बात’ हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावापर्यंत पक्षाचे संघटन पोहोचवून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

गावागावात बैठका घेऊन स्थानिक प्रश्न समजून घेणे, नागरिकांशी संवाद वाढवणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही आमदार जठार यांनी केले.

या चिंतन बैठकीला रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्मिता जावकर, माजी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे, भाजपा नेते व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, सरचिटणीस अक्षयजी फाटक, वसंतजी ताम्हणकर, दापोली पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, दापोली शहर मंडल अध्यक्ष व नगरसेविका जया ताई साळवी, दापोली ग्रामीण अध्यक्ष सचिनजी होडबे, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड नगरपालिका नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा निर्धार करण्यात आला.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात