*कोकण Express*
*कणकवलीतील मल्हारी पुलाची तात्काळ दुरुस्ती करा…*
*अबिद नाईक ; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी…*
*कणकवली ः संजना हळदिवे*
अतिवृष्टीत कोसळलेल्या मल्हारी पुलाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, व कणकवली तालुक्यातील लोकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की,त्यांनी असे म्हटले आहे की, कणकवली तालुक्यातील नरवडे रस्त्यावरील नाटळ येथील मल्हारी पूल अतिवृष्टीमुळे कोसळले आहे.त्यामुळे पलिकडील पाच गावांचा संपूर्णपणे संपर्क तुटला असून त्या पाच गावांतील लोक आपल्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित झाले आहेत.तसेच त्यांना येण्या जाण्या करिता सुद्धा पर्याययी मार्ग उपलब्ध नसून कणकवली सारख्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी १८ ते २० किलोमीटर अंतर तोडून यावे लागणार आहे यामुळे तेथील लोकांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. तरी लोकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी तात्काळ पर्यायी मार्ग तात्पुरत्या स्वरूपाचा बनवून लोकांना येण्या-जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

