बावशी रेशनिंग प्रश्नावर ग्रामस्थांनी केलं उपोषण

बावशी रेशनिंग प्रश्नावर ग्रामस्थांनी केलं उपोषण

*कोकण  Express*

*बावशी रेशनिंग प्रश्नावर ग्रामस्थांनी केलं उपोषण*

*तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत असताना वेगळा प्रस्ताव मंजूर केलाच कसा-संदेश पारकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं. सहायता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येवू नये, या मागणीसाठी आजपासून तोंडवली बावशी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य मनश्री कांडर व इतर ग्रामस्थांनी यांचे उपोषण.

उपोषणाला मा. संदेश भाई पारकर यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या मागण्या येईकून घेतल्या तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत असताना वेगळ रेशनिंग चा प्रस्ताव मंजूर झालाच कसा असा प्रश्न पारकर साहेबांनी उपस्थित केला. या तुमच्या उपोषला योग्य तो न्याय देऊ अस आश्वासन पारकर साहेनांनी ग्रामस्थांना दिले.

या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्या मनश्री कांडर, माजी सरपंच सुप्रिया रांबाडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश रांबाडे, माजी ग्रा. पं. सदस्य दिपक कांडर, सोनाली शिंदे, शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र मर्ये, अबू मेस्त्री आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून व सर्व नियमांचे पालन करुन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच बावशी गावठण, बौद्धवाडी, शेळीची वाडी आदी वाडीतील नागरिक व रेशनकार्ड धारक पाठींबा देण्यासाठी ग्रामपंचायत आवारात उपस्थित आहेत. रेशनिंग प्रस्ताव रद्द करण्यात आलेल्या जय मल्हार बचत गटाला पुन्हा प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येवू नये, यावरुन बावशी ग्रामपंचायत सदस्या मनश्री कांडर व काही ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज उपोषणाला सुरुवात झाली आहे.

मागील उपोषण व आजचे उपोषण पाहता येथे रेशनिंग दुकान प्रस्ताव प्रकरणावरुन राजकीय रंग चढला जात असल्याचे चर्चिले जात आहे. सध्या नांदगाव वि. वि. कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून तोंडवली बावशी फाटा येथे रेशनिंग दुकान सुरू झाले आहे आणि हे सर्वांना सोईचे आहे. ते इतरत्र हलवू नये, ही आग्रहाची मागणी घेऊन ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!