संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत शुभेच्छांचा वर्षाव

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत शुभेच्छांचा वर्षाव

*कोंकण एक्सप्रेस*

*संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत शुभेच्छांचा वर्षाव*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राज्याचे उद्योग मंत्री श्री. उदयजी सामंत, माजी मंत्री व आमदार श्री. दीपकजी केसरकर, माजी आमदार श्री. राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्रीमती नीता कविटकर, श्री. सचिन वालावलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. संजू परब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!