पेंडूरमध्ये ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर्स’चा शुभारंभ

पेंडूरमध्ये ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर्स’चा शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*पेंडूरमध्ये ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर्स’चा शुभारंभ*

*पेंडूर, ता. मालवण : प्रतिनिधी*

पेंडूर येथे ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर्स’ या नव्या व्यवसायाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून नव्या व्यवसायाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

नार्वेकर कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसाय उभे राहणे हे सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संतोष साटविलकर, श्री. बाबा परब, निमंत्रक श्री. रविराज नार्वेकर व श्री. पिट्या नार्वेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी देणाऱ्या या व्यवसायाच्या माध्यमातून ‘बाळराजे फायबर अँड बोट बिल्डर्स’ची यशस्वी वाटचाल होवो, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!