*कोंकण एक्सप्रेस*
*पणदूर आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार – जि.प. सदस्यांचा 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
*प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन न केल्यामुळे पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य श्री. गंगाराम गणेश सडवेलकर यांनी 15 ऑगस्ट 2026 पासून लक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.*
*श्री. सडवेलकर यांनी दि. 03/08/2026 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमाप्रमाणे जनकल्याण समिती स्थापन करणे बंधनकारक असताना ती अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही.*
*”लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे अपमानित करणारी वागणूक दिली जात असेल, तर सर्वसामान्य रुग्णाला मिळणाऱ्या वागणुकीचा विचार करावाच लागेल” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.*
*_28 जून 2026 रोजी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्याला निमंत्रणही देण्यात आले नाही, असा आरोपही त्यांनी केला. _*
*त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे सांगत,तात्काळ जनकल्याण समिती स्थापन करावी.अन्यथा 15 ऑगस्टपासून पणदूर येथे उपोषण करावे लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.*
*सदर निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी कुडाळ, वैद्यकीय अधिकारी पणदूर आणि पोलीस निरीक्षक कुडाळ यांनाही देण्यात आले आहे.*

