तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात वरदा परबचे यश

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात वरदा परबचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात वरदा परबचे यश*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

वेंगुर्ला येथील पाटकर हायस्कूलमध्ये ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वेंगुर्ला हायस्कूलची विद्यार्थीनी कु. वरदा संदिप परब हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने व आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणाने द्वितीय क्रमांक पटकाविला असून तिची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विज्ञान विषयक ज्ञान, विषयाची प्रभावी मांडणी, ओघवती भाषाशैली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर वरदा हिने परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या यशाबद्दल वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनी तिचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!