*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारदीय कीर्तन विद्यालयाची सुरुवात: प्रवेश प्रक्रिया सुरु*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर आणि भगवद्भक्ती प्रबोधिनी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नारदीय कीर्तन परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारदीय कीर्तन विद्यालय सुरू करण्यात येत असून, इच्छुकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या विद्यालयामध्ये अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर यांच्या अभ्यासक्रमानुसार कीर्तन अलंकार पदवीपर्यंतचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाणार आहे. नारदीय कीर्तन कलेचे सखोल प्रशिक्षण, नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन, संगीत व संस्कृत विषयांचे अध्यापन तसेच प्रभावी कीर्तन सादरीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या विद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. प्राचार्य प्रशांत धोंड कार्यरत राहणार आहेत. दर रविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत चिं. त्र्यं. खानोलकर ललित कला केंद्र, कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे नियमित वर्ग भरतील.
या विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ह.भ.प. श्री. प्रशांत धोंड- ९४२३३ ०३४३२ यांचेशी किंवा भगवद्भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे सचिव ह.भ. प. श्री. हृदयनाथ गावडे यांचेशी संपर्क साधावा.
नारदीय कीर्तन परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या या उपक्रमात अधिकाधिक कीर्तनप्रेमी, इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवद्भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग चे अध्यक्ष ह.भ. प. संजय पुनाळेकर यांनी केले आहे.

