*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थी दत्तक पालक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्यावतीने सलग पाचव्या वर्षी विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
वेंगुर्ला साई डिलक्स हॉल येथे १८ जुलै रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, पं.स.चे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, पं.स.सभापती शंकर घारे, सदस्य साक्षी नार्वेकर, शितल राऊत, राज्य प्रतिनिधी दादा जांभवडेकर, सचिन मदने, प्रशांत मडगांवकर, संतोष परब, राजू वजराटकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, पतपेढी जिल्हाध्यक्ष सिताराम लांबर, संचालिका ऋतुजा जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी कोथमिरे तसेच शिक्षण, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक संघटनेचे विविध मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षण, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक समिती सदस्यांच्या पाल्यांचा, निवृत्त शिक्षक तसेच नवनिर्वाचित केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. तर गटसाधन केंद्रातील कायम झालेल्या कर्मचा-यांना समिती परिवारात जाहीर प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आकस्मिक निधी उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिक्षण हा खर्च नसून समाजाच्या विकासासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. प्रत्येक सक्षम व्यक्तीने एका विद्याथ्र्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव रामा पोळजी यांनी केले. निवेदन ऋतिका राऊळ यांनी तर राजू वजराटकर यांनी आभार

