कणकवलीत दुचाकी चोरीचा गुन्हा अवघ्या २ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी

कणकवलीत दुचाकी चोरीचा गुन्हा अवघ्या २ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत दुचाकी चोरीचा गुन्हा अवघ्या २ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी*

*कणकवली : संजना हळदिवे*

कणकवली पोलिस ठाणे हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत शिताफीने अवघ्या दोन तासांत उघड केला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले असून, चोरीची मोटारसायकलही हस्तगत केली आहे.
नेमकी घटना काय?
कणकवली पोलिस ठाण्यात ८ जुलै २०२६ रोजी दुचाकी चोरीचा गुन्हा (गु.र.नं. १६३/२०२६) दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सुनील जनार्दन दारोडे (वय ४०, रा. जामिनी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) याचे लोकेशन शोधून काढले. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांच्या आत, नरडवे नाका येथील बसस्टॉपच्या शेडजवळून पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीची कबुली आणि कारवाई
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला कणकवली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक श्री. मोहन दहिकर आणि अप्पर पोलिस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस हवालदार प्रकाश कदम, जॅकसन गोन्साल्विस आणि डॉमीनिक डिसोझा यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!