पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण*

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण*

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण*

*सिंधुदुर्गनगरी, दि. ०३ (जिमाका) :*

सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वतीने प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक आराखडा सादर करण्यात आला.

यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल , जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक विजय सकपाळ उपस्थित होते.

बैठकीत प्रस्तावित शिवस्मारकाची रचना, पुतळ्याचे स्वरूप, परिसर विकास, तांत्रिक बाबी तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री श्री. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या विविध बाबींचा आढावा घेतला.

यावेळी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक हे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात भर घालणारे ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची उभारणी विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!