चाल आणि गती ह्यांच्या दिशेच्या आत्मपरीक्षणाची गरज : राजेंद्र पेडणेकर

चाल आणि गती ह्यांच्या दिशेच्या आत्मपरीक्षणाची गरज : राजेंद्र पेडणेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*चाल आणि गती ह्यांच्या दिशेच्या आत्मपरीक्षणाची गरज : राजेंद्र पेडणेकर*

*कणकवली | प्रतिनिधी*

येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी, सद्य स्थितीत सरकार, शासन व प्रशासन ह्यांच्याबद्दलच्या सबबी देत तसेच त्यांच्या निर्णयांबद्दलच्या प्रवाहांच्या दिशेबद्दल एका प्रसिद्धी संदेशाद्वारे आत्मपरीक्षणाचे ‘जबाबदार नागरीक’ या नात्याने आग्रहपर आवाहन केले आहे.

राजेंद्र पेडणेकर यांच्या वैयक्तिक मतानुसार, बहुतांश अव्यवस्थेला लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना जबाबदार धरलं जात आहे. ते चूक की बरोबर ह्या वादात आपल्या अमूल्य वेळ खर्ची करताना आपण, ‘आपल्याला नेमकं काय हवंय’ याचा विचार बाजुला ठेवून मुद्द्यांपासून भटकत तर नाही आहोत ना याचीही आत्यंतिक वैचारिक गरज असल्याचे प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे.

प्रत्येकाला शाश्वत भले करणारा विकास हवा आहे व करायचा आहे अशी प्रामाणिकता असेल तर कुठल्याही अनुभवाविना केवळ भीती, परग्रह आणि भरकटवणारे घटक यांच्या आहारी जाऊन आपण शाश्वत विकास प्रणालीमध्ये बाधा तर आणत नाही आहोत ना याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे राजेंद्र पेडणेकर यांनी विशेष अधोरेखित केले आहे.

विकासासाठी कटीबद्ध प्रणालीला त्यांचे काम करताना त्यावर नागरीक म्हणून आपला सतत अंकुश असणे हे संपूर्ण योग्य आहे परंतु ज्या घटकाबद्दल आपण काही जाणत नाही, आपल्याला प्रचिती नाही अशा घटकाबाबत आधीच आक्षेप घेऊन आपण ‘शाश्वतीची क्षती’ तर करत नाही आहोत ना, याचाही आत्मपरीक्षक विचार व चिंतन आपण करुन बघू शकतो असेही श्री. पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

आपण सगळेच, प्रणालीकृत लोकशाहीला मानणारे आहोत त्यामुळे राग, भीती, पूर्वग्रह, असुरक्षितता व चिंता यावर मात करायला आपण नागरीकांचा समूह म्हणून गांभीर्याने खंबिर आहोतच अशा सामर्थ्याची जाणीव घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. ‘आपली चाल आणि गतीची दिशा तर चुकत नाही ना,’ याची आत्मपरीक्षणात्मक गरज आहे असेही त्यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!