सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे जनजागृती कार्यक्रम

सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे जनजागृती कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे जनजागृती कार्यक्रम*

*कणकवली  : प्रतिनिधी*

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे , येथे MKCL सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विषयावर तर सिंधुदुर्ग पोलीस विभाग व आचरा पोलिस स्टेशन यांच्या वतीने अमली पदार्थविरोधी जनजागृती सायबर क्राईम विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.

यावेळी आचरा दूरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सौ मीनाक्षी देसाई मॅडम , राजसी कंप्यूटर एज्युकेशनची सौ मlधवी परब ,अंबिका कॉम्प्युटरचे श्री परेश सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे सर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी श्रीमती देसाई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि हा विषय आपापल्या कुटुंबा पर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.यावेळी श्रीमती परब मॅडम यांनी
विद्यार्थ्यांनी पी टी च्या माध्यमातून मार्गदर्शन केले यात सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, OTP व वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला व दोन्ही विषयांवरील महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.यावेळी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!