*कोंकण एक्सप्रेस*
*साटेली-भेडशी परिसरात सांजाव सण उत्साहात साजरा*
*दोडामार्ग : शुभम गवस*
गोवा आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला सांजाव सण साटेली-भेडशी परिसरात बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. युवकांनी डोक्यावर फुलांचे आकर्षक ‘कोपेल’ परिधान करून पारंपरिक सांजाव गीते गात सणाचा आनंद लुटला.
यावेळी युवकांनी विहिरी व पाणवठ्यांमध्ये उड्या मारून जल्लोष केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आनंदमय वातावरणात साजरा झालेल्या या सणात महिला, युवक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पावसाळ्याच्या आगमनाचे स्वागत, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि समाजातील एकोपा जपण्याचा संदेश देणारा हा सण गोवा तसेच कोकणातील ख्रिश्चन बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. आधुनिकतेच्या काळातही ही परंपरा जपली जात असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.

