दोडामार्गकरांसाठी दिलासादायक निर्णय; उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदांना मान्यता

दोडामार्गकरांसाठी दिलासादायक निर्णय; उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदांना मान्यता

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गकरांसाठी दिलासादायक निर्णय; उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदांना मान्यता*

*दोडामार्ग : शुभम गवस*

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्य शासनाने या रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी दिल्याने भरती प्रक्रिया आणि पुढील प्रशासकीय कामकाजाला वेग मिळणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यानंतर नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अधिक चांगल्या उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल. यामुळे रुग्णांना सावंतवाडी, गोवा किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज कमी होणार आहे.
आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयाचे दोडामार्ग तालुक्यात स्वागत होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!