*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली नगरपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी*
*कणकवली : प्रतिनिधि*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती रविवारी कणकवली नगरपंचायत येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व आदर्श कारभाराचा यावेळी गौरव करण्यात आला. समाजहितासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
या कार्यक्रमास नगरसेवक जयेश धुमाळे, वैभव मालंडकर, प्रसाद अंधारी, मनोज तोरस्कर, संतोष पुजारे, अमोल अघम, उमेश आरोलकर आदी उपस्थित होते.

