२९ वर्षे अपूर्ण असलेला आंब्रड धरण प्रकल्प आ. निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अखेर पूर्णत्वास

२९ वर्षे अपूर्ण असलेला आंब्रड धरण प्रकल्प आ. निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अखेर पूर्णत्वास

*कोंकण एक्सप्रेस*

*२९ वर्षे अपूर्ण असलेला आंब्रड धरण प्रकल्प आ. निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अखेर पूर्णत्वास*

*आमदार निलेश राणे यांनी धरणाची पहाणी करत दिले सिंचन कालव्यांच्या पूर्णत्वाचे आदेश*

*कुडाळ : प्रतिनिधी*

गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून पूर्णत्वास गेले असून धरणाच्या घळभरणीसहित धरणाचे १००% काम पूर्ण करण्यात आले आहे. या धरणात पाणीसाठा करण्यास देखील सुरुवात झाली असून गेली २९ वर्ष अपूर्णावस्थेत असलेले धरण बांधकाम पूर्ण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आंब्रड येथे जाऊन धरणाची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच पुढील सिंचन कालव्यांच्या कामाचा आढावा घेतला. पुढील एक वर्षाच्या आत काळव्यांचे काम पूर्ण करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची सुचना आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी या धरणाचा प्रश्न उपस्थित करून लकरात लवकर काम पूर्ण करून घेतल्या बद्दल सारमळेवाडी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!