नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने परिवहन राज्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले

नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने परिवहन राज्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले

*कोंकण एक्सप्रेस*

*नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने परिवहन राज्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले*

*नशाबंदी मंडळाच्या वतीने देवगड बस स्थानकात ३१ मे तंबाखू विरोधी दिवस साजरा*

*शिरगांव : संतोष साळसकर*

३१मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग, जि प.सामाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग आणि तंबाखू नियंत्रण विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने देवगड बस स्थानकात व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्य परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी राज्यातील सर्व बस स्थानके व राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणारे जनजागृती फलक लावण्याबाबत निवेदन दिले.
३१मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस परिणाम कारक रित्या साजरा करण्यासाठी देवगड बसस्थानकात व्यसनमुक्तीच्या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सुट्टीत आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले असल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी असल्याने या प्रदर्शनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल असे मत आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी व्यक्त केले.
देवगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शाम बुवा प्रवाशांना तंबाखूच्या दुष्परिणामाची माहीती दिली , नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी प्रवाशांना व्यसनमुक्ती व तंबाखू मुक्तीचे पत्रके वाटून तंबाखू मुक्तीची शपथ दिली.
या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीकांत सैतावडेकर व त्यांच्या सर्व टीमचे सहकार्य मिळाले. याशिवाय देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम बुवा आणि त्यांच्या टीमचेही सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!