गुपित ब्राह्मण देवालयाचा 19 मे रोजी वर्धापनदिन सोहळा

गुपित ब्राह्मण देवालयाचा 19 मे रोजी वर्धापनदिन सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*गुपित ब्राह्मण देवालयाचा 19 मे रोजी वर्धापनदिन सोहळा*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव आंबेखोल येथील जागृत श्री गुपित ब्राह्मणदेव देवालयाचा वर्धापनदिन सोहळा १९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त मंगळवारी सकाळी ९ वाजता लघुरुद्र, अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, १२:३० वाजता ब्राह्मण भोजन, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, ६:३० वाजता हळदीकुंकू समारंभ, ७:३० वाजता सत्कार समारंभ, ९ वाजता किंजवडे येथील श्री पावणाई प्रासादिक वारकरी भजन मंडळाचे वारकरी दिंडी भजन होणार आहे. या वर्धापनदिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री गुपित ब्राह्मण विश्वस्त मंडळ व जीर्णोद्धार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!