दारुमचे संजय भोसले यांना राष्ट्रीय योगसन स्पर्धेत कास्य पदक

दारुमचे संजय भोसले यांना राष्ट्रीय योगसन स्पर्धेत कास्य पदक

*कोंकण एक्सप्रेस*

*दारुमचे संजय भोसले यांना राष्ट्रीय योगसन स्पर्धेत कास्य पदक*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती,डीग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन अमरावती, योगासन फिजीकल फेडरेशन ऑफ इंडिया आणि बृहन्महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग-निसर्गोपचार ऊन्हाळी शिबीराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्त घेण्यात आलेल्या खुल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ,कासार्डे विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक आणि दारुमचे रहीवाशी श्री. संजय दत्तात्रय भोसले . यानी कास्य पदक पटकावले असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धा नुकत्याच १६ मे २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील हनुमान व्यायाम मंडळाच्या भव्य सभागृहातपार पडल्या. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रराज्या व्यतीरिक्त दिल्ली , गुजरात , तामीळनाडू इ.राज्यातुन एकूण १५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते.
यामध्ये ५५ वर्षा वरील पुरुषांच्या वयोगटात श्री.संजय दत्तात्रय भोसले यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांना कास्य पदक, स्मृर्ती चिन्ह, व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.या पूर्वी त्यांनी महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या योगासन जज्ज परीक्षा ( जिल्हा व राज्यस्तरीय) यशस्वीपणे उतीर्ण झाले असून पंजाब (पटियाळा) येथील एन आय एस येथील राष्ट्रिय योगासन कोच परीक्षेतही उत्तम यश प्राप्त केले आहे.
राष्ट्रिय योगासन स्पर्धा या वयोगट ८ ते१५ (मुले व मुली) , १५ ते २२ ( मुले व मुली) , २२ ते ३० (मुले व मुली ), ३० ते ४० (महिला व पुरूष ), ४० ते ५५ (महिला व पुरुष )आणि ५५ वर्षावरील सर्व महिला व पुरुष असे एकूण १२ गटात खेळवण्यात आल्या.
पुरूषांच्या ५५ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक-एस एन एम श्यामल,(तामिळनाडू) यानी पटकावला. त्यांना सुवर्णपदक,स्मृर्तीचीन्ह व सन्मानपत्र देवून गौरवले.
तर द्वितीय क्रमांक अमरावतीच्या डॉ.चंदनसिंह रामसिंह राजपूत यांचा आला .त्यांना रजत पदकाने व स्मृर्तीचिन्ह ,सन्मानपत्र देऊन गौरवले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक व दारुमचे रहीवाशी संजय दत्तात्रय भोसले. यांनी त्तृतीय क्रमांक पटकावला, त्यांना कास्यं पदक , स्मृर्तीचीन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवन्यात आले.


यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून पद्मश्री प्रभाकरराव वाडीया, ॲड. प्रशांत देशपांडे , डॉ.श्रीनिवास देशपांडे,डॉ.माधुरी चेंडके, डॉ.अरुण खोडसकर , डॉ. सूर्यकांत पाटील,डॉ. सुनील लबडे प्रा. नितीन काळे, प्रा. प्रवीन अनारसे, डॉ.निलेश जोशी,सौ.अर्चना देशपांडे, श्री पुष्पक खोंडे,आदी. मान्यवर ऊपस्थित होते.
राष्ट्रिय योगासन स्पर्धेचे जज्जीस म्हणून ( परिक्षणाचे) काम सुकन्या देशमुख, प्रतिक कांबळे, संतोष चंडेल, भाग्यश्री कानडे, वर्षा शर्मा, संपदा आगरकर, श्रावण लांबट, यश उमेकर, प्रिन्स कोहम आणि जयदिप कानकिया इ.नी काम पाहीले.
शेवटी संदिप मांडले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!