डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन दि. १२ मे रोजी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन दि. १२ मे रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन दि. १२ मे रोजी.*

*कणकवली ः संजना हळदिवे*

नारिंग्रे बौध्द विकास मंडळ नारिंग्रे आणि नारिंग्रे बौध्द विकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन दि. १२ मे २०२६ रोजी संपन्न होत आहे. या निमित्त १२ व १३ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

यानिमित्त दिनांक १२ मे रोजी सकाली मिरवणूक, ध्वजारोहण वास्तूसंबंधी नामफलकाचे अनावरण, उद्घाटन, मुर्ती प्रतिष्ठापना, पूजापाठ, धम्मदेसना, मान्यवरांचे मनोगत

दुपारी स्नेहभोजन, संध्याकाळी भव्य मिरवणूक नारिंग्रे पोस्ट ते दहिबांव कॅन्टीन, रात्री स्नेहभोजन, रात्रौ ऑर्केस्ट्रा स्वरसंध्या प्रबोधरपर भीम बुध्द गीतांचा कार्यक्रम,

दिनांक १३ मे रोजी सांघिक मनोरंजन खेळ, महिलांसाठी (खेळ पैठणीचा) प्रथम पारितोषिक : पैठणी, रात्री स्नेहभोजन, स्थानिक कलाकार विविध गुणदर्शन आणि एकांकिका असे कार्यक्रम होणार आहेत. या वेळी मनोहर रामचंद्र नारिंग्रेकर अध्यक्ष-नारिंग्रे बौध्द विकास मंडळ, प्रमुख मार्गदर्शक प्रा. गिरीश रा. साळवे उपप्राचार्य, से. नि. चेतना महाविद्यालय, वांद्रे, मुंबई, कार्यकमाचे उद्घाटक सुनिल पारकर जि.प. सदस्य, प्रा.सुषमा हरकुळकर, डॉ. श्रीकांत धारपवार, डॉ. रावजी कदम सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, नविनचंद्र बांदिवडेकर उद्योगपती, संदेश धुवाळी सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महेश वसंत राणे सरपंच,महेश विजय जंगले उपसरपंच, संदीप राणे पोलीस पाटील,रमेश नाना भावे, मंडले, संजय यशवंत राणे मुख्याध्यापक कुणकेश्वर हायस्कुल, उन्मेश बाळ राणे स्तंभलेखक तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!