*माहीरा फाउंडेशन व शिवसेना तर्फे बांद्यात ११ मे रोजी महाआरोग्य मेळावा*

*माहीरा फाउंडेशन व शिवसेना तर्फे बांद्यात ११ मे रोजी महाआरोग्य मेळावा*

*कोंकण एक्सप्रेस*

*माहीरा फाउंडेशन व शिवसेना तर्फे बांद्यात ११ मे रोजी महाआरोग्य मेळावा*

*बांदा ः प्रतिनिधी*

सर्वसामान्य नागरिकांना तज्ञ वैद्यकीय सेवा सुलभ दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माहीरा फाउंडेशन आणि रियाज खान शिंदे शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी बांदा येथे भव्य “महाआरोग्य मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा पार पडणार असून विविध आजारांवरील तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

या मेळाव्यात तज्ञ नेत्ररोग तज्ज्ञांकडून मोफत नेत्रतपासणी तसेच नेत्रपटल तपासणी केली जाणार आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत नेत्रपटल उपचार व शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. याशिवाय मोफत नेत्र तपासणी करून ५० टक्के सवलतीच्या दरात चष्मे देण्यात येणार आहेत. फेको पद्धतीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ सहा हजार रुपयांत करण्यात येणार आहे.

मूत्ररोग विभागात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मुतखडा, प्रोस्टेट आणि किडनी स्टोनवरील मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच मधुमेह व रक्तदाब रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे.

मेळाव्यात सोनोग्राफी ६०० रुपये, २-डी इको ७५० रुपये, ईसीजी १०० रुपये, एक्स-रे ३०० रुपये दरात उपलब्ध राहणार असून रक्त तपासण्या ५० टक्के सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.

या महाआरोग्य मेळाव्यात डॉ. संजय केसरे (एमबीबीएस, सोनोलॉजिस्ट), डॉ. रोहित शिरोडकर (एमएस, एमसीएच, व्हिट्रिओ रेटिना सर्जन) तसेच डॉ. जयश्री केसरे (एमबीबीएस, नेत्रचिकित्सक) हे तज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत.

रुग्णांनी येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, जुने वैद्यकीय रिपोर्ट्स आणि सुरू असलेली औषधे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

नोंदणीसाठी बांदेश्वर डायग्नोस्टिक पॉलिक्लिनिक आणि आय केअर सेंटर, सायरा कॉम्प्लेक्स, बांदेश्वर मंदिरानजीक, बाजारपेठ बांदा येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९८६०८०३९३३ तसेच केसरे मॅडम – ९४२२९०६९३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!