गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर

गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर

*कोंकण एक्सप्रेस*

*गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर*

*कणकवली ः संजना हळदिवे*

फिर्यादी युवराज तोडणकर व संशयित आरोपींपैकी सुजल केळुस्कर यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून तोडणकर यांच्या वडिलांना गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तसेच विचारणा करण्यास गेलेल्या युवराज व अन्य दोघांनाही मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी जयेंद्र शिरपूटे, गितांजली केळुस्कर व कु. हिना केळुस्कर यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

१६ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युबराज व आरोपी सुजल यांच्यात झालेल्या किरकोळ वादानंतर फिर्यादीचे वडील दांडी समुद्र किनारी असताना आरोपी सुजल, त्याचे वडील संतोष केळुस्कर, काका रोहित केळुस्कर यांनी बिअर बाटली, दांडा व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली. त्याबाबत फिर्यादी विचारणा करण्यासाठी गेले असता, या आरोपींसह महादेव केळुस्कर, जयेंद्र शिरपूटे, गीतांजली केळुस्कर व हिना केळुस्कर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई व सोडविण्यासाठी आलेल्या नेहा तोडणकर यांचा विनयभंग केला. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी सुजल, संतोष व महादेव केळुस्कर यांना अटक केली होती. तर मारहाणीत सहभागी असलेले सुजलची आई गितांजली, बहिण हिना व मित्र जयेंद्र शिरपूटे यांनी अटकुपर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होत प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर करताना तपासात ढवळाढवळ करू नये, साक्षीदारांना धमकावू नये व तपासात सहकार्य करावे आदी अटी घातल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!