*कोंकण एक्सप्रेस*
*सेवानिवृत्त सैनिक लक्ष्मण गवस यांचा बोडदे येथे जाहीर सत्कार*
*दोडामार्ग : शुभम गवस*
बोडदे गावचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त सैनिक श्री लक्ष्मण सिताराम गवस उर्फ बापू यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा आज, दि. ०८ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशसेवेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित, दोडामार्ग यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल कृष्णा गवस यांच्या शुभहस्ते श्री लक्ष्मण गवस यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक श्री प्रदीप हरिश्चंद्र गवस उपस्थित होते.
कार्यक्रमास बोडदे गावातील माजी सैनिक, ग्रामस्थ, सरपंच, पोलिस पाटील, वीरमाता, वीरपत्नी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी श्री लक्ष्मण गवस यांच्या देशसेवेचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

