साळशी नं. १ प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

साळशी नं. १ प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी नं. १ प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव*

*वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील केंद्रशाळा साळशी नं. १ या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तसेच गणित व इंग्रजी विषयात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये देवयानी बागवे (इ. ७ वी – प्रथम), रुद्र आचरेकर (इ. ६ वी व इंग्रजी विषयात प्रथम), रुतिका साटम (इ. ५ वी व गणित विषयात प्रथम), लक्ष्मी गावकर, गौरी नाईक (इंग्रजी विषयात प्रथम), मानसी परब, भूषण देवणे (गणित विषयात प्रथम) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

ही पारितोषिके यशवंत आप्पाशेट माळवदे (आई लक्ष्मीबाई माळवदे यांच्या स्मरणार्थ), श्रीमती पद्मावती पुरुषोत्तम पालयेकर (वडील आत्माराम व काका लक्ष्मण देवू साळसकर यांच्या स्मरणार्थ) तसेच ॲड. बी. एस. गावकर या शिक्षणप्रेमींनी दिलेल्या कायमस्वरूपी ठेवीतून देण्यात आली. तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना संतोष साळसकर यांनी बक्षिसे दिली.

कार्यक्रमात शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. नूतन शिरगाव पंचायत समिती सदस्या शीतल तावडे यांचा शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वैशाली सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच पांडुरंग मिराशी, ग्रामपंचायत सदस्य कैलास गावकर, विशाखा साळसकर, अदिती रावले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश गावकर, पंचायत समिती सदस्या शीतल तावडे, सुनील गावकर, सत्यवान सावंत, जयसिंग गावकर, पोलीस पाटील कामिनी नाईक तसेच मुख्याध्यापक प्रकाश झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षिका स्मिता कोदले यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश झाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पदवीधर शिक्षक ज्ञानोबा हाके यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी साळशी येथील शिक्षणप्रेमी दिलीप साळसकर यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशंसा व्यक्त करत ५,००० रुपयांची कायमस्वरूपी ठेव देण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!