कणकवलीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी

कणकवलीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

बौधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे साजरी करण्यात आली.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त चिकणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगराध्यक्ष संदेशपारकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेविका दीपीका जाधव यांनी भेट देऊन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शाहीर नायकवडी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहीती देनारी चित्र फीत स्क्रीनवर दीवसभर दाखवण्यात आली. कलाकार विनोद जाधव यांचे बॅजो वादन करण्यात आले. दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील गायक अजित हरकुळकर,भूषन मिठबावकर, शुभम जाधव ,सौरभ जाधव यांनी कराओ-केवर भिम गिते सादर केली. शाहीर संदेश तांबे शिवडावकर यांनी शाहीरी जलसा सादर केला. शालेय विद्यार्थी आणि गायकांनी यावेळी भीमगीते सादर केली. कणकवली सिद्धार्थनगर येथील अनुयायांच्या भव्य रॅली काढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संस्था, जाति -जमातीच्या संघटनांच्या पदाधिकाºयांनी जयंतीच्या सोहळ्याला भेट देत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. उत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर, अ‍ॅड.सुदिप कांबळे, सुजित जाधव, शंकरनाना कदम, भीमराव जाधव, प्रभाकर कदम, प्रकाश सांगवेकर, सचिन तांबे, संदीप तांबे, हेमंत कांबळे, सुशिल कासले, ,उमेश बुचडे, दीपक कांबळे, दिलीप कदम, संजय कांबळे, संतोष भोमकर, आरती कांबळे, सानिका कांबळे, प्रणाली कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!