व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश*

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश*

*कोंकण एक्सप्रेस**

*व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश*

*15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जिमाका)* :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला येथील तीन, तसेच मागासवर्गीय मुलींचे मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि देवगड येथील पाच अशा एकूण आठ शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी दि. 7 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांकडे जमा करणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व्यायामशाळा (जिम) तसेच इंटरनेट (वाय-फाय) सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 02362-228882 वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!