मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक, ३ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक, ३ ठार

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक, ३ ठार*

*कणकवली ः संजना हळदिवे*

मुंबई-गोवा महामार्गावर जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक रस्त्यावर आलेल्या म्हशींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तीन म्हशींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उर्वरित दोन म्हशी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी म्हशींना मदत करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावर भटक्या जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!