रक्तदान शिबिरात 36 जणांचे रक्तदान

रक्तदान शिबिरात 36 जणांचे रक्तदान

*कोंकण एक्सप्रेस*

*रक्तदान शिबिरात 36 जणांचे रक्तदान*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

सिंधुदुर्ग रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर वेताळ प्रतिष्ठान आणि भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे वेंगुर्ला अध्यक्ष डॉ.आनंद बांदेकर यांच्या हस्ते झाल. यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश नागवेकर, सुजाता पडवळ, भंडारी समाज तालुका अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर, उपाध्यक्ष गजानन गोलतकर, संचालक रमेश नार्वेकर, विकास वैद्य, राजेंद्र कांबळी, सदानंद केरकर, दीपक कोचरेकर, श्रेया मांजरेकर, सद्गुरू सावंत, किरण राऊळ, सागर सावंत, माधव तुळसकर, प्रमोद तांबोसकर, रोहित गडेकर आदी उपस्थित होते. रक्तदान कार्यात नेहमी योगदान देणा-या सर्पमित्र महेश राऊळ यांचा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.सचिन परूळकर यांनी तर आभार डॉ.जी.पी.धुरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!