*कोंकण एक्सप्रेस*
*महिला वकिलांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
समाजात अनेक अडचणींवर मात करत न्यायक्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणा-या महिला वकिलांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेसाठी “एका स्त्री वकिलाचा घरापासून कोर्टापर्यंतचा भावनिक प्रवास’ हा विषय ठेवण्यात आला असून 700 ते 1000 शब्दांमध्ये निबंधाची मांडणी करावयाची आहे. निबंध पाठविताना स्व:हस्ताक्षरात लिहिलेला निबंध आणि ओळख दर्शविणारा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 1000, 700, 500, उत्तेजनार्थ 250 ची प्रत्येकी दोन तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धकांनी आपली निबंध 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस द्वारा- डॉ.सचिन वासुदेव परूळकर, मु.पो.तुळस, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग 416516 (मोबा. 9421238053) या पत्त्यावर पाठवावयाचे आहेत. या स्पर्धेत महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन विवेक तिरोडकर व अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी केले आहे.

