गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीचे सुयश

गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीचे सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीचे सुयश*

*कणकवली  : प्रतिनिधि*

सन 2025 मध्ये घेतल्या गेलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये विद्यामंदिरच्या इयत्ता पाचवीच्या पार्थ पंडित तेली या विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच दुर्वा मनिष कुबल-94, साहीर इंद्रजीत खांबे- 92, गौरेश संतोष सावंत- 92, राजस्व भूपेंद्र मोडकर -90, देवश्री विनायक पाटील -86, भार्गवी मिलिंद केळुसकर -86,भाग्येश उमेश घाडीगावकर -86, कबीर महेंद्रकुमार आडोळे -86 या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे गणित शिक्षक संदीप वामनराव नागभिडकर तालुकाध्यक्ष, गणित अध्यापक मंडळ कणकवली तसेच सूर्यकांत खरात, नेताजी जाधव, महेश्वरी मटकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शि. प्र. मं. कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!