*कोकण Express*
*वेऺगुर्ले भाजपा चा अनोखा उपक्रम*
पंतप्रधान नरेंद्र मोदी याऺचा ” मन की बात ” कार्यक्रम शेतकरयां सोबत पाहीला …*
*वेऺगुर्ले ःःप्रतिनिधी*
प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या रविवारी असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी याऺचा *मन की बात* हा कार्यक्रम वेऺगुर्ले तालुक्यात भाजपा पदाधिकारी आपल्या बुथ वर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पहातात . परंतु या वेळी हा कार्यक्रम शेतकरयांसोबत पहाण्याचे नियोजन वेऺगुर्ले तालुक्यातील पेऺडुर गावातील शेतकरयाच्या खळ्यात करण्यात आले .
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली . तसेच शेती व्यवसाय फायदेशीर बनविण्यासाठी मोदी सरकार सेंद्रिय शेती , शुन्य खर्चाधारीत शेती आणि नैसर्गिक शेती या प्रकाराना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले . शेतकरयांना पशुपालन , मस्त्योत्पादन या सारख्या जोडधंद्यातुन उत्पन्न मिळावे यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , ता.उपाध्यक्ष संतोष गावडे , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, उपसरपंच प्रमोद शिरोडकर , बुथप्रमुख हर्षल परब , दिपक परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
तसेच संभाजी मोहन गावडे, कृष्णा शंकर नाईक, तानाजी बाळू नाईक, रामदास सखाराम नाईक, तन्मय तानाजी नाईक, सुरेश रुमा नाईक, उत्तम वासुदेव नाईक, भार्गव सुरेश नाईक, सचिन संदीप नाईक, विजय रामचंद्र नाईक, सदानंद विठ्ठल गावडे, संदीप ज्ञानेश्वर नाईक, लक्ष्मण लवू गावडे, संतोष शंकर नाईक, नारायण गणपत नाईक, प्रभाकर दशरथ गावडे, गुरुनाथ शिवराम कवठणकर, उत्तम शिवराम कवठणकर, नरेंद्र एकनाथ गावडे, अंकुश रामचंद्र नाईक, दीपक गुरुनाथ कवठणकर, प्रभाकर रुमा नाईक, तुकाराम देवू नाईक, बाळू नारायण नाईक, श्रीम. सीमा दीपक कवठणकर, वैशाली सखाराम नाईक, सुमित्रा सखाराम नाईक, तनुजा तानाजी नाईक, अंकिता अंकुश नाईक इत्यादी महीला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.