*मनोहर पालयेकर यांच्या कार्याचा वसा पुढे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल*

*मनोहर पालयेकर यांच्या कार्याचा वसा पुढे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल*

*कोंकण एक्सप्रेस*

*मनोहर पालयेकर यांच्या कार्याचा वसा पुढे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल*

*कलमठ येथील शोकसभेत मान्यवरांनी पालयेकरांना वाहिली श्रद्धांजली*

*कणकवली ः संजना हळदिवे*

मनोहर पालयेकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी विविध संघटनांमध्ये काम करताना जनहिताला प्राधान्य दिले. जनहिताच्या कामांमुळे त्यांचा लोकसंपर्क मोठा होता. विविध संघटनांमध्ये पालयेकर यांनी निष्ठेने व प्रामाणिपणे काम केले. त्यांच्या जण्याने सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून घेणे कठीण आहे. त्यांचा कार्याचा वसा पुढे नेणे ही त्यांना खरा अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मनोहर पालयेकर यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध संघटनांनी कलमठ येथील पेन्शनर्स भवन येथे शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी राजाराम परब, उद्योजक दीपक बेलवलकर, रिमा भोसले, सिद्धार्थ तांबे, राजन भोसले, राजन चव्हाण, प्रदीपकुमार जाधव, पूजा सावंत, गौरी साळकर, प्रियांका दळवी, अनुप्रिया रेगे, लक्ष्मण प्रभू, ज्ञानेश पाताडे, महानंद चव्हाण, सुभाष राणे, विलास चव्हाण, वामन करंबेळकर, दत्तात्रय भोसले, गणपत उर्फ भाई चव्हाण, गोविंद साळकर, रमेश जोगळे, अर्जुन राणे, श्रद्धा कदम, प्रकाश दळवी, अशोक नाईक, प्रा. हरिभाऊ भिसे, एल. एल. सपकाळ, सुगंधा देवरुखकर, अर्र्जुन राणे, महेंद्रकुमार मुरकर, लवू पिळणकर, धाकू तानवडे, कुबेर भोजे, भास्कर वंजारे, महादेव चव्हाण, विक्रांत पालयेकर आदी उपस्थित होते.
शोकसभेत सखाराम सपकाळ, राजेश रेगे, अर्जुन राणे, रमेश जोगळे, गोविंद साळकर, डी. पी. तानवडे, दीपक बेलवलकर, श्रद्धा कदम, प्रा. हरिभाऊ भिसे, राजाराम परब, महानंदा चव्हाण, लक्ष्मण प्रभू, भाई चव्हाण, रिमा भोसले यांनी मनोगते व्यक्त करताना मनोहर पालयेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. विक्रांत पालयेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!