*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट प्रशालेत कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम; स्व. वसंतराव नाईक यांना कृतज्ञ अभिवादन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट येथे ‘कृषी दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव जागविण्यात आली.
संस्थेचे संचालक मा. श्री. रंजनजी नेरुरकर व मा. श्री. संदेशजी सावंत यांच्या शुभहस्ते प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. “एक वृक्ष… एक संकल्प” या संकल्पनेतून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पारकर सर, पर्यवेक्षक श्री. राठोड सर, श्री. फड सर, हरित सेना प्रमुख श्री. गोसावी सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
यावेळी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदर्शी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. शाश्वत शेती, जलसंधारण आणि हरित पर्यावरण या मूल्यांचा वारसा जपत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

