*कोकण Express*
*उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचा बॅनर हटवला अन् पुन्हा लावला…!*
*नगरपंचायतकडे बॅनर’ची “फी” भरून बॅनर लावला…!*
*कणकवलीतील सामंत गटातील समर्थक आक्रमक…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारा लावलेला बॅनर नगरपंचायत ने हटवल्यानंतर या संदर्भात रीतसर नगरपंचायत कडे फी भरल्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा बॅनर लावण्यात आला. कणकवली शहरात लावलेल्या या बॅनर मुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान या बॅनरची परवानगी घेतलेली नसल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार नगरपंचायतने हा बॅनर हटविला होता. मात्र त्यानंतर तात्काळ संबंधितांनी या बॅनरची रीतसर फी नगरपंचायत जवळ भरणा केल्यानंतर हटवलेला बॅनर संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. व त्यानंतर उदय सामंत समर्थकांनी हा बॅनर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावला.

