कणकवली नरडवे रोडवर शॉर्टसर्किटने आग लागून तारा तुटल्या

कणकवली नरडवे रोडवर शॉर्टसर्किटने आग लागून तारा तुटल्या

*कोकण Express*

*कणकवली नरडवे रोडवर शॉर्टसर्किटने आग लागून तारा तुटल्या*

*नगरसेवक सुशांत नाईक यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न*

कणकवली शहरात रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या नरडवे रोड वर नाथ पै नगर जवळ शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे तारांच्या खालील कचर्‍याने पेट घेतला. यामुळे पोलवरील तारा अक्षरशः रस्त्यावर तुटून पडल्या. शॉर्टसर्किटने कचऱ्याने पेट घेतला व याच वेळी रिक्षाचा फायबर टप या कचरा टाकलेल्या ठिकाणी होता त्यांने ही पेट घेतल्याने ही आग अजून भडकली. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अखेर याबाबत माहिती मिळताच जिल्हा बँक संचालक नगरसेवक सुशांत नाईक यांनी तातडीने नगरपंचायत चा बंब बोलावत स्वतः आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच तारा तुटल्या बाबत महावितरण कर्मचाऱ्यांना कल्पना देत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करायला लावला. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आली. मात्र आगीमुळे तुटलेल्या तारा मात्र रस्त्यावरती लोंबकळत होत्या. दरम्यान या ठिकाणचा काही भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा अन्य पर्यायी मार्गा वरून सुरू करण्याच्या सूचना श्री नाईक यांनी दिल्या. यावेळी योगेश मुंज, युवा सेना शहर प्रमुख तेजस राणे, वैभव सावंत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. नगरपंचायत च्या बंबा द्वारे आग आटोक्यात आणण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!