वैभववाडीत कमळ चषक’स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडीत कमळ चषक’स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

*कोकण Express*

*वैभववाडीत कमळ चषक’स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

*आमदार नितेश राणे यांच्या वतीने जि.प.च्या तिन्ही मतदार संघात स्पर्धेचे आयोजन*

*वैभववाडी  ः प्रतिनिधी*

केंद्रीय उद्योगमंत्री नामदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तिथवली येथे ‘कमळ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अनेक संघांनी या स्पर्धेत प्रवेश घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक युवा शक्ती बाजार पेठ कुसुर,द्वितीय क्रमांक विश्वशांती हेत, तृतीय क्रमांक भुतेश्वर क्रीडा मंडळ उंबर्डे, चतुर्थ क्रमांक रायझिंग स्टार कोळपे हे संघ या स्पर्धेचे मानकरी ठरले. तर मालिकाविर – योगेश ,युवा शक्ती बाजार पेठ कुसुर
फलंदाज – संदेश ,विश्वशांती हेतगोलंदाज – अक्षय पांचाळ , भुतेश्वर क्रीडा मंडळ क्षेत्र रक्षक – प्रणय शिवगण भुतेश्वर क्रीडा मंडळ यांनी वैयक्तिक पारितोषिक टकावली. हुसेन भाई लांजेकर यांनी केलेल्या चांगल्या नियोजनाचे कौतुक केले व विजेत्या संघांचे अभिनंदन केले. जि. प. गटाची स्पर्धा असली तरी संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किशोर दळवी योगदान खूप मोठं आहे,स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजनाचे संपूर्ण श्रेय किशोर दळवी यांना जाते. तसेच जि. प. गट निहाय स्पर्धा असली तरी त्याचे संपुर्ण श्रेय भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष किशोर दळवी ,गांगेश्वर मंडळ व भुतेश्वर मंडळ यांना जाते  यांचं सहकार्य खूप मोलाचे असल्याचे मत बोबडे सर यांनी यावेळी व्यक्त केले. अत्यंत कौतुकास्पद नियोजन, आमदार साहेब सदैव युवकांच्या व जनतेच्या पाठीशी, युवा वर्गाला क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल नासिर भाई काझी यांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार.

या प्रसंगी नासिरभाई काझी, हुसेन भाई लांजेकर, सरपंच बोबडे सर, उपसरपंच  दशरथ दळवी ,चिटणीस प्रकाश काटे,प्रदीप दळवी,वासुदेव पावसकर, आत्माराम शिवगण,कादिर फारास, विजय संकपाळ, महेश चव्हाण, सचिन दळवी, गणेश शिवगण उंबर्डे ग्रामस्थ, गांगेश्वर मंडळ पदाधिकारी व सदस्य, भुतेश्वर मंडळ पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. युवा मोर्चा भाजपा वैभववाडी किशोर दळवी यांनी स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्व मान्यवर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ,ग्राम पंचायत उंबर्डे, गांगेश्वर मंडळ, भुतेश्वर मंडळ,सर्व सहभागी संघाचे आभार मानले तसेच मोठ्या स्पर्धा न भरवता जि.प. गट व शहर स्पर्धा भरवून स्थानिक युवा वर्गाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित केल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!