*कोकण Express*
*तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा…*
*प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा…*
*तहसीलदार अजय पाटणे*
*मालवण ः प्रतिनिधी*
भारतीय लोकशाही सर्वात बळकट आहे. संविधानाने नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावत मतदान करायला हवे. त्या बरोबर मतदानाबाबत जनजागृती ही केली पाहिजे. असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे केले.
येथील तहसील कार्यालय येथे आज राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, निवासी नायब तहसीलदार जी. कोकरे, नायब तहसीलदार अनंत मालवणकर, नायब तहसीलदार नागेश शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित, प्रा. पवन बांदेकर व अन्य उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. ओटवणेकर यांनीही मार्गदर्शन केले.
२०२१-२२ वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यात पारवाडी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नरेश परब (लिपिक) आचरा ग्रामपंचायत, पोईप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष नाईक (कोतवाल पोईप) तहसील कार्यालय, कांदळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शीतल परब (पोलीस पाटील) पोलीस निरीक्षक कार्यालय, आंबडोस मतदान केंद्रस्तरीय अधिकारी राजेंद्र गोसावी (सहायक शिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडोस कदमवाडी, मालवण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विनोद वाघमोडे (कनिष्ठ सहायक) सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय मालवण. यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

