तळेरे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्षपदी पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर याची बिनविरोध निवड

तळेरे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्षपदी पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर याची बिनविरोध निवड

*कोकण Express*

*तळेरे विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्षपदी पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर याची बिनविरोध निवड*

*तळेरे  ः प्रतिनिधी*

तळेरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तळेरे, ओझरम, दारुम,साळिस्तेच्या अध्यक्षपदी कणकवली पंचायत समिती माजी सभापती श्री दिलीप तळेकर याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून प्रदिप जनार्दन तळेकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी सभापती मनोज रावराणे,माजी बांधकाम सभापती बाळा जठार, राजेश माळवदे, सुर्यकांत तळेकर, शशांक तळेकर, मनोज तळेकर,भालेकर, बंड्या मांजरेकर,उदय तळेकर,राजेश जाधव,राजा तळेकर, प्रशांत राणे, दिपक नांदलसकर, दिनेश मुद्रस,रवी शेट्ये, उल्हास कल्याणकर,नाना शेटये, मंगेश कांबळे, मयुरेश लिंगायत, उदय बारस्कर,निवडणूक अधिकारी सुमती अनंत ढवण सोसायटी सचिव रश्मी खटावकर याच्यासह सर्व संचालक,पंचक्रोशितील ग्रामस्थ उपस्थित होते.

निवडीनंतर बोलनाना दिलीप तळेकर म्हणाले, सर्व संचालक मंडळासह,सर्व सभासद, शेतकरी व ग्रामस्थांचे हिताचे निर्णय घेत लोकाभिमुख कारभार करणार असून यासाठी आपण माझ्यावर जो विश्वास टाकला तो सर्थकी लावून काम करणार असल्याचे सांगीतले. उपाध्यक्ष प्रदिप तळेकर यानी मतदार व संचालक मंडळानी टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!