आजगाव शेटकर वाडी येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करा

आजगाव शेटकर वाडी येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करा

*कोकण  Express*

*आजगाव शेटकर वाडी येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करा..*

*अन्यथा टॉवरवर चढून उपोषण करणार..*

*सरपंच तथा सामजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांचा इशारा*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आजगाव शेटकर वाडी येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करा अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामस्थांना सोबत घेवून टॉवरवर चढून उपोषण करेन असा इशारा सरपंच तथा सामजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी दिला आहे.
आजगाव, धाकोरा, भोम या परिसरात नेटवर्कची मोठी समस्या आहे. यामुळे या भागातील नागरिकांमधून मोबाईल टॉवर उभारण्याबाबत वेळोवेळी मागणी करण्यात येत होती. त्यालाच अनुसरून बीएसएनएल कंपनीने आजगाव शेटकरवाडी येथे मोबाईल टॉवर उभारला आहे. टॉवर उभारून एक वर्षाहून अधिक काळ होऊनही हा उभारलेला टॉवर नेटवर्क सेवेसाठी कार्यान्वित करण्यात आलेला नाही. कोरोना संक्रमण सुरू असल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच नोकरदार वर्ग हा वर्क फ्रॉम होम कॉम्प्युटर वरून करत आहे. असे असताना गावात नेटवर्क उपलब्ध नसल्याने शाळकरी मुलांना डोंगर माथ्यावर ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध होते. अशा उंच ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना घनदाट जंगलातील रानटी प्राण्यांमुळे मुलांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. तसेच घरून काम करणाऱ्या नोकरदार वर्गालाही नेटवर्क नसल्याने नेटच्या शोधात इतरत्र जाऊन काम करावे लागत आहे. आजगाव गावात मोबाईल टॉवर उभारून एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे तरी अद्याप कार्यान्वित केलेला नाही.म्हणून सद्यस्थितीत हा टॉवर शोभेची वस्तू बनला आहे.वारंवार या टॉवर कार्यान्वित करण्यासाठी बीएसएनएल कडे पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे मळेवाड कोंडूरे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी या आजगाव येथील टॉवर कार्यान्वित होण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने पाठपुरावा सुरु केला असून येत्या 15 ऑगस्ट 2021 पूर्वी टॉवर कार्यान्वयित न झाल्यास या टॉवरवर चढून उपोषण करण्याचा इशारा मराठे यानी दिला आहे. मराठेंच्या या भूमिकेला स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींचा ही प्रतिसाद लाभत असून आता बीएसएनएल या टॉवर बाबत कोणती कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!