वैभववाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा

वैभववाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा

*कोकण Express*

*वैभववाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा*

*आरोग्य केंद्रास ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वाटपासह कोव्हिड योद्धांचा करण्यात येणार सन्मान*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

उद्या मंगळवार दि.२७ जुलै रोजी महाराष्टाचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहात संपन्न होणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी ९.०० वाजता दत्त मंदिर वैभववाडी येथे अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर दुपारी १२.०० वाजता उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात येणार असून दुपारी २.३० वाजता वैभववाडी पंचायत समितीच्या सभागृहात शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या सौजन्याने कोरोना काळात प्रामाणिक व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी छत्री वाटपाचा कार्यक्रमही पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडीचे माजी सभापती रमेश तावडे, वैभववाडी शहर प्रमुख प्रदिप रावराणे यांसह तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी , युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!