लूट केलेल्या डॉक्टरांच्या विरोधात तालुकास्तरीय समितीकडे तक्रारी द्याव्यात

लूट केलेल्या डॉक्टरांच्या विरोधात तालुकास्तरीय समितीकडे तक्रारी द्याव्यात

*कोकण Express*

*लूट केलेल्या डॉक्टरांच्या विरोधात तालुकास्तरीय समितीकडे तक्रारी द्याव्यात*

*रुग्णांच्या,नातेवाईकांच्या मनसे पूर्णपणे पाठीशी राहणार*

*माजी आमदार परशुराम उपरकर यांचे आवाहन*

*कणकवली :- संजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची लूटमार करण्यात आली आहे. कणकवली बिल नियंत्रण समितीकडून दोन खाजगी कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनला नोटीसा बजावण्यात आहेत. तशीच जिल्ह्यातील अन्य कोविड सेंटरची चौकशी व्हावी. रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले रोख स्वरुपात घेऊन लूटमार केलेली आहे. कोरोना बाधित रुग्णांनी तालुका नियंत्रण समितीच्या अध्यक्ष तथा नायब तहसीलदारांकडे रितसर लेखी तक्रारी कराव्यात, मनसे त्यांच्या पाठीशी राहील असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.
कोरोना बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे दराप्रमाणे बिले आकारणे आवश्यक आहे. पण अनेक रुग्णांकडून बाहेरुन तपासण्या करण्यात आल्या, त्याचेही पैसे वेगळ्या करण्यात आलेले आहेत. औषधांचे पैसे वेगळ्या प्रकारे करण्यात आलेले आहे. दोन ते अडीच लाखांपर्यंत बिले घेऊन कोरोना बाधित रुग्णांना कर्जाच्या खाईत लोटण्याचा काम काही खाजगी डॉक्टरांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.त्यानुसार बिल नियंत्रण समितीच्या वतीने बिलांची तपासणी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहार करण्याचे निर्बंध लादले आहेत. तरीदेखील लूटमार करणारे डॉक्टर रोखीच्या स्वरुपात पैसे घेऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नागवण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहेे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!