मेडिकल इमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी

मेडिकल इमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी

*कोकण Express*

*मेडिकल इमर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी*

*दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल होणार*

*तहसीलदार अजय पाटणे यांची माहिती*

*मालवण ः प्रतिनिधी*

कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तरी ९ मे रात्री १२ ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल एनर्जन्सी व्यतिरिक्त नागरिकांनी घरा बाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाईल. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या ऑन स्पॉट कोरोना टेस्ट करण्यासाठी फिरते वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन प्रत्येकाने करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशानुसार ज्या सेवा संबंधित व्यवसाईकांनी घरपोच द्यावयाच्या आहेत. त्यांनीही नियमांचे व वेळेचे पालन करावे. असेही आवाहन तहसीलदार यांनी केले.

ज्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची आहे. त्यांना लसीकरण केंद्रावर जाण्यास सवलत असेल. अशी माहितीही तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!