लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून मूर्तिकार सन्मान

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून मूर्तिकार सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून मूर्तिकार सन्मान*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून मूर्तिकार सन्मान उपक्रम राबविण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची लगबग सुरु झालीय मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्यात व्यस्त आहेत. अशातच सामाजिक भान लक्षात घेत नेहमीच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने हळवल गावातील मूर्तिकारांचा सन्मान करण्यात आला. मूर्ती घडवत असताना आवश्यक असलेल्या साहित्याच वाटप करत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मूर्तिकारांचा सन्मान करण्यात आला. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हे मागील अनेक वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, शालेय आणि क्रीडा क्षेत्रात काम करत आहे. या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम दरवर्षी राबविले जातं असतात. मूर्तिकारांचा सन्मान उपक्रम राबविल्याबद्धल हळवल गावातील मूर्तिकारांनी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत मंडळाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, अरुण राऊळ, सचिव दिपेश परब, उमेश परब, दिपक राऊळ,दशरथ परब, विकास गावडे, अमोल केरकर, अनिकेत परब, यशवंत परब, मनोज धुरी, यश परब, विक्रांत परब, मंदार परब, निल परब, पार्थ परब, वैदेही परब, सोहम धुरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!